नौका…

नौका…

पडणाऱ्या पावसासारख्याच
आठवणी कोसळतात
एकामागून एक
झरझर वाहू लागतात…

पौर्णिमेच्या रात्री
तुझ्या समईचा प्रकाश
पाझरत राहतो अखंड
या माझ्या मंदिरात…

अखंड तेवत असतात
अगणित जीवन ज्योती
एक पवित्र यज्ञ
अगणित आहुती…

अगणित दुःखे
अगणित अश्रू
प्रलयात मिणमिणतो
एक जीवनबिंदू…

क्षणभंगुर आयुष्य
तरीही किती अनंत
काव्यमय ब्रह्मपुत्रा
वाहत राहते नितांत…

कधी फेसाळत
कधी शांत
कधी अगदीच बेताल
कधी गहन, अथांग…

हाकारतो माझी नौका
एक अदृश्य नावाडी
नेतो पैलतिरी
डगमगती जुनी होडी…

ही झाडं, पक्षी, आकाश
त्याचीच गाणी गातात
डोळे बंद करून
मी बनतो प्रकाश…

सूर्यास्त होतो
गंगारती संपते
वाहणारी नौका
समुद्रास जाऊन मिळते…

_ ओजस .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: